हे सर्व लेखन २०१८ ते २०२० या दोन वर्षांदरम्यानचे आहे. भारतासाठी ही दोन वर्षे जणू दोन शतकांसारखी भासत आहेत...
करोना विषाणूमुळे ‘आज़ादी’ या संकल्पनेला अजून एक विचित्र आयाम प्राप्त झाला आहे. या मुक्त विषाणूने आंतरराष्ट्रीय सीमारेषांची जणू थट्टाच उडवली. या साथीमुळे आपल्या आजवरच्या जीवनपद्धतीवर एक निराळाच प्रकाशझोत पडला. ज्या मूल्यांवर आधुनिक समाज उभारला आहे, त्याबद्दल प्रश्न विचारण्यास, तसेच आजवर आपण कोणत्या गोष्टींना पूजनीय मानले आणि काय बाजूला सारले, हेही पडताळून पाहण्यास या साथीने आपल्याला भाग पाडले.......